वार्तादूत : डिजिटल न्युज नेटवर्क , लोहारा – सुमित झिंगाडे
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील श्रीकांत माणिक सूर्यवंशी यांच्या शेतातील ऊसाला अचानक लागलेल्या आगीत ५ एकर ऊस जळून खाक झाला. असून ही घटना दि ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली असून या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून. महावितरण कार्यालयाच्या हलगर्जी पणा मुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी धानुरीचे तलाठी श्री पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्येकशात जळालेल्या उसाच्या क्षेत्राची पाहणी करून पंचनामा केला.तसेच देवबेट देवी शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी मिळून महावितरण कार्यालयाला वारंवार सूचना देऊन देखील या कडे लक्ष न दिल्याने शॉटसर्किट मुळे ही आग लागली असे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे, यावेळी धुरांचे लोट पसरल्यानंतर शेतकऱ्यांनी तेथे धाव घेतली.व पोलिस प्रशासन, अग्निशामक दलानेही घटनाची माहिती मिळताच तेथे दाखल होत मदतकार्य सुरू केले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी तत्काळ दाखल होत घटनेची जळालेल्या ऊस क्षेत्राची पाहणी केली. या घटनेनंतर आता तरी महावितरण ला जाग येईल अशी यावेळी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली,