लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर (mahatma basaveshwar) महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी (दि.१०) प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच नंदी ध्वजारोहण करण्यात आले.
सर्वप्रथम लोहारा (lohara) शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात विधीवत पुजा करून ध्वज उभारण्यात आला. जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महात्मा बसवेश्वर चौक येथे प्रतिमा पुजन करण्यात आले. पुढील तीन दिवसात किर्तन, स्पर्धा परीक्षा, मिरवणूक आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी शरणाप्पा जट्टे, दत्ता बिराजदार, शंकर जट्टे, शिवानंद माशाळकर, बलू स्वामी, संगन्ना स्वामी, जालिंदर कोकणे, चंद्रकांत पाटील,अभिमान खराडे, आयुब शेख, उमाशंकर जट्टे, अविनाश माळी, दयानंद गिरी, के.डी. पाटील, प्रशांत काळे, अमीन सुबेकर, अमोल बिराजदार, दिपक मुळे, शाम नारायणकर, मल्लिनाथ घोंगडे, हरी लोखंडे, दत्ता फावडे, मल्लिनाथ फावडे, जगदीश लांडगे, आयुब शेख, इकबाल मुल्ला, प्रमोद बंगले, संजय दरेकर, रघुवीर घोडके, सुधाकर मुळे, विकास घोडके, महेबूब गवंडी, सलीम शेख, दगडू तिगाडे, रौफ बागवान, ओम पाटील, चिदानंद जट्टे, शहाजी जाधव, प्रवीण संगशेट्टी, प्रकाश होंडराव, बंडप्पा वैरागकर जयंती उत्सव समितीचे सागर पाटील, गणेश कमलापुरे,वीर फावडे, गणेश पालके यांच्यासह जयंती उत्सव समितीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते. दरम्यान आ. ज्ञानराज चौगुले (mla dnyanraj chougule) यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shiwaji maharaj) चौकात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.