Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सास्तुरच्या स्पर्श रुग्णालयास ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
09/10/2024
in लोहारा तालुका
A A
0
सास्तुरच्या स्पर्श रुग्णालयास ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार

लोहारा (Lohara) तालुक्यातील सास्तुर (sastur) येथील स्पर्श रुग्णालयाला (sparsh hospital) मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे यांच्या तर्फे मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त दिला जाणारा “मराठवाडा रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, पुणे येथे मंगळवारी (दि.८) दिमाखदार सोहळ्यात स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला. मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे तर्फे मराठवाडा मुक्तीदिनाच्या स्मृती निमित्त दर वर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना/ संस्थाना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शिक्षक रत्न, उद्योग रत्न, आदर्श पत्रकारिता, आरोग्य रत्न, साहित्य रत्न, शिक्षण रत्न, संगीत रत्न, कला रत्न इ. पुरस्कार देण्यात येतात. पद्मश्री भिकुजी (दादा) इदाते मा. अध्यक्ष केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्धाभटक्या जमाती विकास मंडळ नवी दिली यांच्या शुभहस्ते तसेच गो.ब.देगलूरकर मा. कुलसचिव डेक्कन अभिमत महाविद्यालय, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब जाधव, मराठवाडा मित्र मंडळ कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘मराठवाडा आरोग्य रत्न’ हा मानाचा आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन रमाकांत जोशी यांनी केले. ते आपल्या भाषणात म्हणाले कि, किल्लारी सास्तूरच्या प्रलयंकारी भूकंपानंतर येथील तातडीच्या आरोग्य सेवेची गरज ओळखून ३० खाटांच्या इवल्याश्या रोपट्याचे रुग्णालयाचे वृटवृक्षात रुपांतर झाले आहे. या वटवृक्षाची एक एक फांदी, पारंबी म्हणजे स्पर्शचे आरोग्य सेवेतील अनेक दर्जेदार उपक्रम आहेत. यात सास्तुरचा दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने पावसाच्या पाण्याचे बोअर पुनर्भरण ज्याव्दारे दुष्काळात देखील बोअरवेलव्दारे पाणी उपलब्ध होते. वैद्यकीय प्रक्रीयेव्दारे सांडपाण्याचा पुनर्वापर, कर्मचारी व रुग्ण यांच्या सहकार्याने श्रमदानातून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन, जो ताजा भाजीपाला रुग्णालयात कॅन्टीनमध्ये रुग्णांचे भोजन तयार करण्यासाठी वापरला जातो. विविध आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतीचे आयुष उद्यान, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, ३ फिरत्या आरोग्य पथकांमार्फत परिसरातील दुर्गम गावात ज्या ठीकाणी शासकीय आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही अशा १२४ गावात या पथकामार्फत आरोग्य सेवा पुरवली जाते. तसेच एच.आय.व्ही.संसर्गित व्यक्तींना मानसिक आधार व सकस आहार मोफत पुरवणे इ. उल्लेखनीय नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. बाह्यरुग विभागात २७ वर्षात जवळपास १.५ कोटीच्या वर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून वर्षाला ८० हजाराच्यावर रुग्ण बाह्यरुग्ण विभागात दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घेतात. Bed Occupancy Ratio सातत्यपूर्ण १२५ टक्केच्यावर असून दर वर्षाला १५०० ते १६०० नॉर्मल बाळंतपणे, ६०० ते ७०० सिझेरियन शस्त्रक्रिया, १२०० ते १३०० मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया दर वर्षाला होतात. स्वच्छतेला कमालीचे महत्व दिल्या जात असलेल्या स्पर्श मध्ये दर शनिवारी स्वच्छतेची शपथ घेऊन कर्मचारी डॉक्टर्स व रुग्णांचे नातेवाईक श्रमदानातून रुग्णालयाच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करतात.
ग्रामीण रुग्णालय स्पर्शमध्ये बाह्य रुग्ण विभाग, अंतरुग्न विभाग, प्रसूतीगृह, अद्यावत मॉडूलर शस्त्रक्रिया गृह, अद्यावत उपकरण उक्त सुसज्ज प्रयोगशाळा, क्ष-किरण विभाग, औषधी विभाग, ईसीजी विभाग, सोनोग्राफी विभाग, लसीकरण विभाग, प्रसूती मतांसाठी स्वतंत्र कक्ष, नवजात अर्भकांसाठी एन.बी.एस.यु., किचन गार्डन, सर्वासाठी आर.ओ.मिनिरल वॉटर पाणी पुरवठा चहा, कॉफी, सूप मशीन, रुग्णासाठी वाचनालय, दूरदर्शन, रक्त साठवण केंद्र, रुग्णांना ने आन करण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका सर्व प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता इ. सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या ग्रामीण रुग्णालय स्पर्शला अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. परंतु ज्या मातीत आपण काम करतो ज्या मातीचे ऋण फेडताना आपल्या माणसांनी कार्याचे कौतुक करण्यासाठी दिलेला हा “मराठवाडा रत्न” पुरस्कार विशेष हुरूप, उभारी देऊन जातो. त्याबद्दल मराठवाडा (Marathawada) सेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिनकर चौधरी, कार्याध्यक्ष दिनेश सास्तूरकर, सचिव गणेश चौधरी यांचे विशेष आभार मानले. मराठवाडयात आजही अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. ज्यात शेतकरी आत्महत्या, प्रचंड होत असलेले स्थलांतर, व्यसनाधिनता, बेरोजगारी इ. मध्ये सर्वांनी लक्ष घालून या समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन रमाकांत जोशी यांनी यावेळी केले.

Tags: पुरस्कार.मराठवाडास्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

मार्डी मध्ये उडीद मूग व सोयाबीन शासकीय हमीभावाने होणार खरेदी

Next Post

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचा लोहारा शहरात जल्लोष

Related Posts

लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

17/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
Next Post
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचा लोहारा शहरात जल्लोष

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचा लोहारा शहरात जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's