लोहारा (lohara) तालुक्यातील जेवळी (jewli) येथील महात्मा बसवेश्वर (mahatma basaveshwar) महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित यात्रा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शेवटच्या दिवशी जेवळी बसवरत्न पुरस्काराचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
रविवारी (दि. १२) झालेल्या जोरदार पावसामुळे यात्रा महोत्सव याच्याकडून कुस्तीच्या मैदानावर चिखल झाल्याने कुस्ती आखाडा रद्द करण्यात आला. तर त्यादिवशी रात्री होणारे कार्यक्रम हे सोमवारी (दि.१३) सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी जेवळी बसवरत्न सोहळा, चिराग ग्रुप दिल्ली यांचे मनोरंजन तर योगिता माने यांचा लावणी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनिप्र गंगाधर महास्वामी व प्रगतशील शेतकरी विलास कारभारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कल्याणी ढोबळे हे होते. यावेळी मनिप्र गंगाधर महास्वामी यांच्या हस्ते जेवळी येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या नऊ मान्यवरांना जेवळी बसवरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविकांना दिल्लीच्या चिराग ग्रुपचे मनोरंजन तर योगिता माने हिच्या सदाबहार लावणी कार्यक्रम झाला. दिलखेचक लावणीच्या अदावरीने प्रेक्षक घायाळ झाले होते. या कार्यक्रमानंतर यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली. या संपूर्ण यात्रा महोत्सवात सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक शिवशरण कारभारी यांनी केले.
यात्रा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष बसवराज कारभारी, सचिव मल्लिनाथ डिग्गे, महादेव मोघे, गुंडाप्पा कारभारी, बाळासाहेब कठारे, सत्तेश्वर कारभारी, सुभाष सारणे, बालाजी निंगशेट्टी, महादेव सारणे, प्रशांत मुरमे, अनिल भैराप्पा, सुधाकर गुंजोटे, यांच्यासह यात्रा कमिटीने परिश्रम घेतले.
———–
जेवळी बसवरत्न पुरस्काराने सन्मान
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बाबूराव माळी, संशोधक सिद्रामप्पा धरणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. एम. बिरादार, शास्त्रज्ञ बालाजी भैराप्पा, आदर्श शिक्षक मोहन धोत्रे, वैद्यकीय सेवा उज्वल कारभारी, अभियंता प्रसाद पाटील, डॉ. कल्याणी भुसणे, पोलिस विठ्ठल होनाजे या नऊ जणांचा जेवळी बसवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.