लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (दि.६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. विनोद आचार्य व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रोडगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. इक्बाल मुल्ला व बालाजी बिराजदार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत कांबळे यांनी सामुदायिक त्रिसरण पंचशिल पठण केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी माटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रितम शिंदे, रिपाई तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, मिलिंद नागवंशी, निळकंठ कांबळे, प्रकाश भगत, रोहीदास कांबळे, महादेव कांबळे, दत्ता कांबळे, शरद कांबळे, सुमित कांबळे, राजपाल वाघमारे, तुळजाराम कांबळे, सुशिल कांबळे, दादा घोडके, बालाजी मोदळे, जयश्री कांबळे, विमल शिंदे, सखुबाई शिंदे, किसाबाई सरवदे, आरपीआय रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, किशोर भालेराव, उपनगराध्यक्ष आयुब शेख, मिलाप मित्र मंडळाचे अध्यक्ष दादा मुल्ला, सुनिता कांबळे, अनिता कांबळे, अनुसया शिंदे, सुर्वणा कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.