लोहारा तालुक्यातील माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व प्रथम एज्युकेशन प्रशिक्षण संस्था किल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या दरम्यान हे प्रशिक्षण होणार आहे. या कोर्सद्वारे दोन वेगवेगळ्या विषयासंबधीचे प्रशिक्षण विद्यार्थांना देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यासाठी सोलार प्लांट इन्स्टालेशन व इलेक्ट्रीक मेंटनेन्स हा विषय असून विद्यार्थ्यीनीसाठी हेल्थ केअर असिस्टंट असा विषय आहे. दोन्ही प्रशिक्षणातील विद्यार्थी प्रवेश क्षमता ही ४० असून हे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत आहे. यात सहभाग घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून घ्यावी व आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एन. रेडे, उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. थोरे यांनी केले आहे. सदरील कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी मिळेल. यामध्ये वेगवेगळ्या कंपन्याकडून नोकरीची हमी घेतली जाईल व नोकरीची खात्री देण्याची हमी औद्योगिक कौशल्य विकास संस्था किल्लारी यांच्यावतीने करण्यात आली आहे.
या प्रशिक्षणासाठी सहभाग घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे प्रा. डॉ. एस. ई. मुंडे, प्रा डॉ. ए. पी. बिराजदार, प्रा. डॉ. के. ए. लोमटे, प्रा. डॉ. पी. एम. मोरे यांच्याकडे त्वरीत द्यावी असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.