मराठवाडा (marathwada) मुक्ती संग्राम दिनानिमित्त जेवळी येथील लेखक बाबुराव माळी लिखित पुस्तक प्रकाशन व माजी विद्यार्थी संवाद मेळावा होणार असून याप्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात लोहारा (lohara) हायस्कूल शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी व तसेच नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रतिष्ठानचे बाबुराव माळी व भारत काळे यांनी केले आहे. १७ सप्टेंबर या दिवशी हैदराबाद संस्थानाला निजामाच्या तावडीतून मुक्ती मिळाली. त्यापूर्वी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा ज्यात उस्मानाबाद आजचे धाराशिव बीड परभणी नांदेड व औरंगाबाद आजचे संभाजीनगर या पाच जिल्ह्याचा समावेश होता. त्यांना व तेलंगणातील आठ, कर्नाटकातील तीन जिल्ह्यातील लोकांना १७ सप्टेंबर रोजी मोकळा श्वास घेता आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी यांनी जो लढा दिला आणि आजच्या पिढीला १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाची माहिती व्हावी यासाठी या दिनाचे औचित्य साधून बाबुराव पिराजी माळी लिखित हैदराबाद मुक्ती संग्राम या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी हायस्कूल लोहारा शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षकांचा संवाद मेळावा होणार आहे.
या पुस्तक प्रकाशन सोळा प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक विश्वास धुमाळ, विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर डॉ. गणपतराव मोरे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बागल, स्त्रीरोग तज्ञ डॉ. कार्तिक यादव, आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश ढगे, दिलीप चव्हाण, विद्या विकास प्रतिष्ठानचे भारत काळे सह आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतिहास तज्ञ, लेखक वक्ते भाऊसाहेब उमाटे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. माजी निवृत्त शिक्षणाधिकारी, साहित्यिक, लेखक बाबुराव माळी लिखित हैदराबाद मुक्तिसंग्राम या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असून याप्रसंगी हायस्कूल लोहारा शाळेचे माजी विद्यार्थी शिक्षकांचा संवाद मेळावा देखील पार पडणार आहे. हा कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटाला सुरु होऊन दुपारी २ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे.