भाजपाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानच्या माध्यमातून लोहारा शहरात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२) या प्रशिक्षण शिबिरास सुरुवात होणार आहे.
लोहारा मंडळाच्या वतीने मंडलस्तरीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, इतिहास, संघटन बळकटी व प्रभावी कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. लोहारा शहरातील सरस्वती कन्या शाळा येथे हे निवासी प्रशिक्षण शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, जि. प. अध्यक्षा अर्चना पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य, जिल्हा उपाध्यक्ष अभय चालुक्य, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना उमरगा-लोहारा विधानसभा सह अध्यक्ष शरण पाटील, उमरगा लोहारा विधानसभा प्रमुख राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, महिला मोर्चा, युवा मोर्चा, गटप्रमुख, गणप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख तसेच सर्व आघाडी प्रमुख व लोहारा मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले आहे.








