लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील महिन्यात पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचा प्रवाशांना आधार झाला आहे.
मागील काही आठवडे उन्हाची वाढलेली तिव्रता, सुर्य आग ओकत असताना ४० अंशाच्या जवळपास गेलेला पारा पाहता रस्त्याने ये-जा करणारे नागरीक, प्रवासी, लहान बालके, आबालवृद्ध यांना सहज पिण्याचे थंडगार पाणी उपलब्ध व्हावे. विकतचे पाणी घ्यावे लागु नये यासाठी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाले मेडीकल समोर कै. नागनाथ बिरुजी घोडके गुरूजी यांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घोडके परीवाराकडून पाणपोई सुरु करण्यात आली होती. या पाणपोईचा नागरिकांना मोठा आधार झाला आहे.
सकाळपासूनच उन्हाचा पारा नकोसा झाला तरी कामानिमित्त घराबाहेर पडणारे प्रवासी, अबालवृध्द दिवसभरात अनेकजण थंडगार जारच्या हे पाणी पीत आहेत. पाणपोई सुरू केल्याबद्दल अनेकजण समाधान व्यक्त करीत आहेत.
————
यावर्षी वाढलेल्या उन्हाच्या तिव्रतेमुळे प्रवासी, अबालवृध्द यांना विकतचे पाणी न घेता थंडगार पाणी मिळावे, सामाजिक बांधिलकी व आजोबांची शिकवण लक्षात घेवून आजोबांच्या स्मरणार्थ ही पाणपोई सुरू केली आहे. याचा नागरिकांना उपयोग होत आहे.
विकास घोडके,
शिक्षक