लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील मुख्याधापक सुरेश रोहिणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मंगळवारी (दि. १) त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष गोंविदराव साळुंके हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा संस्थेचे सचिव प्रा. सुरेश बिराजदार, कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सरपंच भाग्यश्री पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजीराव मारेकर, श्रीपाद कुलकर्णी, एम. डी. मोरे, प्राचार्य एस. ए. आवताडे, मुरलीधर पाटील, अशोक कुंभार, माजी सरपंच नारायण गुरव, सरस्वती रोहिणे, सचिन रोहिणे, संजय रोहिणे, उपसरपंच हुसेन शेख, अमोल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सुरेश रोहिणे यांचा संस्थेच्या व विविध शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी एम.डी. मोरे, धनराज फुरडे, शिवकन्या जाधव, ऋतुजा बिराजदार, सुरेश रोहिणे, सुनील साळुंके, गोविंदराव साळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना प्रा. सुरेश बिराजदार म्हणाले की, समाज सुधारणेच्या कार्यात शिक्षकांचे योगदान मोठे असून शिक्षक पिढ्या घडविण्याचे महत्वाचे कार्य करीत असतो. सेवानिवृतीनंतर शिक्षकांनी सामाजिक कार्य हाती घेऊन समाज सेवा करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर सूर्यवंशी यांनी तर बळीराम नांगरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक सतीश वाकडे, यु.टी. गोरे, संजय साळुंके, प्रा. एन.टी. तेलंग, प्रा.वामन भोरे, गिरीष भगत, एम.डी.काळे, रूपेश सरवदे, विकास गोरे, अब्दुल अत्तार, के.डी. कांबळे, शिवाजी कांबळे आदीनी पुढाकार घेतला. यावेळी गावातील व परिसरातील शिक्षक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.