लोहारा तालुका पत्रकार संघाच्या पहिल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ह.भ.प. गुरुवर्य गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते बुधवारी (दि. २२) करण्यात आले.
लोहारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी प्रथमच आकर्षक व लोकाभिमूख दिनदर्शिका काढण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन हभप गुरुबाबा औसेकर महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी गजानन मक्तेदार, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, जसवंतसिंह, बायस, गिरीश भगत, सदाशिव जाधव, तानाजी माटे, गणेश खबोले, विनायक मक्तेदार, संग्गाण्णा स्वामी आदी उपस्थित होते.