लोहारा शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे, उपाध्यक्ष पदी आकाश विरोधे तर सचिव पदी प्रदिप घोडके यांची निवड करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.२३) रात्री आठ वाजता लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी प्रताप घोडके, जगदीश लांडगे, वाघमोडे सर, सुरेश पांढरे, विकास घोडके, बालाजी विरुदे, दगडू तिगाडे हेयांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे, उपाध्यक्ष पदी आकाश विरोधे तर सचिव पदी प्रदिप घोडके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सहसचिव पदी अमित महानुर व कोषाध्यक्ष पदी श्रीकांत तिगाडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी रघुवीर घोडके, सुधीर घोडके, प्रशांत लांडगे, अप्पा देवकर, अंबादास विरुदे, विजय महानुर, महेश वाघे, जयसिंग बंडगर, पांडुरंग घोडके, प्रश्नांत थोरात, अंकुश बंडगर, संदीप घोडके, अनिल विरोधे, कृष्णा विरोधे, काका घोडके, अजय घोडके, राहुल विरुदे, सुमित महनुर, धवल खताळ, हर्षवर्धन खताळ, नितीन वाघे, शिवा तिगाडे, महेश घोडके, ऋषिकेश तिगाडे, वैभव घोडके, बाळासाहेब घोडके, गोपाळ घोडके, ओमकार लांडगे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज एकतेचा व प्रगतीचा संदेश देण्यात आला व भविष्यात समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली.