लोहारा तालुक्यात अनेक ठिकाणी शनिवारी (दि.२४) रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. मराठा (maratha) योद्धा मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या आदेशानुसार सर्व ठिकाणी रास्ता रोको ( rasta roko) आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार लोहारा तालुक्यातही हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. लोहारा (lohara) शहरासह तालुक्यातील हिप्परगा, धानुरी, आरणी पाटी यासह तालुक्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे आंदोलन दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर चारच्या नंतर गावोगावी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
लोहारा येथील आंदोलनात बाळासाहेब पाटील, प्रशांत काळे, महेश गोरे, रमेश वाघोले, सुशांत गोरे, अक्षय माळवदकर, तानाजी पाटील, विश्व गोरे, सतीश गोरे, अविनाश गोरे, बळी गोरे, संजय मुरटे, नानासाहेब गोरे, दिलीप कदम, आप्पा जाधव, सचीन नरगाळे, विजय कदम, वैभव सूर्यवंशी, रोहीत गोरे, प्रशांत थोरात, महेश देशमुख, दिपक गोरे, जयपाल जाधव, ब्रह्मानंद ढोबळे, विशाल गोरे, संतोष गोरे, दत्ता घाडगे, सुरेश जाधव, उत्तरेश्वर उपरे, राम कदम, अर्जुन कदम, संतोष पवार आदी सहभागी झाले आहेत.