महिलांसाठी विरंगुळा व महिला तणावमुक्त रहाण्यासाठी स्पर्धांची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. रूपाली श्रीगीरे केले आहे. लोहारा शहरातील प्रथमच सखी स्मार्ट गृहिणी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी डॉ. श्रीगिरे बोलत होत्या.
लोहारा शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने लोहारा शहरात प्रथमच खास महिलांसाठी आगळीवेगळी सखी स्मार्ट गृहिणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन लोहारा येथील डॉ. रूपाली हेमंत श्रीगीरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहशिक्षीका वर्षा चौधरी, महानंदा चव्हाण, निर्मला दंतकाळे, अर्चना साखरे, शामल ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. रूपाली श्रीगीरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून फीत कापुन उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीगीरे यांचा सत्कार जयंती मंडळाच्या वतीने वर्षा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिलांसाठी विरूंगळा व तणावमुक्त राहण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीगिरे यांनी केले.
यानंतर श्रीगीरे यांनी उखाणा घेवून व बकेटमध्ये बॉल टाकून या स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये शब्द आमुचा उखाणा तुमचा, बकेटमध्ये चेंडू टाकणे, शब्द आमुचा गीत तुमचे व बौध्दिक यामध्ये महापुरुषावर आधारीत प्रश्नांचा समावेश होता. चार फेऱ्यामध्ये स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेचा आनंद घेत आगळीवेगळी स्पर्धा घेतल्याबद्दल आयोजकाचे अभिनंदन केले. या स्पर्धेमध्ये सखी स्मार्ट गृहिणी प्रथम – प्रणाली सावंत, द्वितीय मधुबाला औटे, तृतीय मोनाली वाघमारे, उत्तेजनार्थ- निर्मला दंतकाळे यांनी पारितोषक मिळवली. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, चषक देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी डॉ. रूपाली श्रीगीरे, सुनिता पवार, सारिका वाघमोडे, नितीन वाघमारे, भागवत वाघमारे यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून विकास घोडके यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी अमित बोराळे, महादेव कुंभार, बालाजी मक्तेदार, रसूल शेख, सचिन भंडारे, नरेंद्र औटे यांचे सहकार्य लाभले. यावेळी पी. आर. दिक्षीत, सुप्रिया माळवदकर, मधुबाला औटे, भाग्यश्री कांबळे, मिनाक्षी पांचाळ, प्रियंका भंडारे, रुपाली वाघमारे, जान्हवी घोडके, एम.एन. वाघमारे, आर. एस. कांबळे, आर. डी. सुरवसे, माया कांबळे, एम. वाय. वाघमारे यांच्यासह अनेक महिला स्पर्धक सहभागी झाले होते.