लोहारा (lohara) तालुक्यातील कानेगाव ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव लोभे हे अपात्र ठरले आहेत. याप्रकरणी धाराशिव जिल्हाधिकारी (dharashiv collector) डॉ. सचिन ओंबासे यांनी मंगळवारी (दि.२) आदेश दिले आहेत अशी माहिती विधीज्ञ दत्तात्रय घोडके यांनी दिली आहे.
या प्रकरणी विधीज्ञ दत्तात्रय घोडके यांनी सांगितले आहे की, तालुक्यातील कानेगाव येथील सरपंच नामदेव लोभे यांना सरपंच म्हणून चालू राहण्यास किंवा पंचायतीच्या सदस्यांच्या पदाच्या उरलेल्या कालावधीसाठी सरपंच म्हणून निवडला जाण्यास अपात्र करण्यात येत आहे असा आदेश दिला आहे. याप्रकरणी सरपंच नामदेव लोभे यांच्या विरुद्ध अमोल पाटील, नितीन पाटील, बळवंत जगताप, लिंबराज पाटील, पांडुरंग कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी सदर ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये आवश्यक असणाऱ्या आर्थिक वर्षातील किमान चार ग्रामसभा घेतलेल्या नाहीत म्हणून त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली होती. त्यामुळे ते सरपंच म्हणून राहण्यास अपात्र ठरतात. तसेच दुसऱ्या तक्रारीमध्ये सदर ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच यांनी तीन मासिक सभेचे आयोजन करण्यास ते अपयशी झालेले आहे म्हणून देखील तक्रार केलेली होती. ज्यामुळे ते इथून पुढील कालावधी करिता सरपंच म्हणून राहण्यास अपात्र ठरतात. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन कानेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच नामदेव लोभे यांना अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.२) जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आदेश दिला आहे. त्यानुसार कानेगाव येथील सरपंच नामदेव लोभे यांना सरपंच म्हणून चालू राहण्यास किंवा पंचायतीच्या सदस्यांच्या पदाच्या उरलेल्या कालावधीसाठी सरपंच म्हणून निवडला जाण्यास अपात्र करण्यात येत आहे असा आदेश दिला आहे अशी माहिती विधीज्ञ दत्तात्रय घोडके यांनी दिली आहे. सदर प्रकरणी तक्रारदार यांच्या वतीने विधीज्ञ दत्तात्रय घोडके यांनी काम पाहिले.