लोहारा तालुका क्रिडा कर्मचारी संघाच्या वतीने बुधवारी (दि. ३) हायस्कूल लोहारा मैदानावर तालुक्यातील क्रिडा कर्मचाऱ्यांच्या संघातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला कर्मचारी, खेळाडूंच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, सुदर्शन जावळे, युसुफ पटेल, खिजर मोरवे, रसुल शेख, भीमाशंकर डोकडे, गोविंद घारगे, विकास घोडके, प्रविण अगंबरे, नितीन वाघमारे, राम पांचाळ, युनुस शेख, एस. एम. शेख, वर्षा चौधरी, असिफा सय्यद, अर्चना साखरे, निर्मला दंतकाळे, सुप्रिया माळवदकर, सुषमा जट्टे, वंदना अकोसकर, अस्मिता सुरवसे, वर्षा शेटकार, मनीषा राठोड, शिवाजी पोतदार, नितीन कदम, सुरेश साळुंके, राम पांचाळ, प्रदिप जाधव, किसन भुजबळ, डि. एम. कुर्ले, लिंबराज साठे, गजानन सुतार, नितीन पाटील यांच्यासह सर्व विभागाचे क्रिडा कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचा संचलन सराव विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण यांनी घेतला. यानंतर क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हाॅलीबॉल सामन्याचा सराव गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.