Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नियोजित कार्यक्रम साखरपुड्याचा, झाला विवाह सोहळा; अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळे करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
31/12/2023
in लोहारा तालुका
A A
0
नियोजित कार्यक्रम साखरपुड्याचा, झाला विवाह सोहळा; अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळे करण्याचे तहसीलदारांचे आवाहन
Ad 10

साखरपुड्याच्या कार्यक्रमाला म्हणून दोन्हीकडील नातेवाईक आले खरे. पण जाताना मात्र नवदाम्पत्यांना वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद देऊन गेले. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन लोहारा तालुक्यात झालेल्या हा विवाह सोहळा.
झाले असे की, तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील प्रगतशील शेतकरी दत्ता सूर्यवंशी यांची कन्या रोहिणी व खेड येथील प्रगतशील शेतकरी कै. गोविंद पाटील यांचा मुलगा शुभम पाटील यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम गुरुवारी (दि. २८) धानुरी येथील शिवार गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोन्हीकडील नातेवाईक आले होते. हा कार्यक्रम होत असताना मुलीकडील नातेवाईक धानुरी येथील उद्योजक भागवत बनकर व मुलाचे मामा खेड येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार काकडे यांनी आपसात चर्चा करून याच कार्यक्रमात विवाह करण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला उपस्थित नातेवाईकांनी होकार दर्शविला आणि याच कार्यक्रमात विवाह सोहळा झाला. अनावश्यक खर्चाला फाटा देत घेतलेल्या या निर्णयाचे परिसरात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा विवाह सोहळा होत असल्याची माहिती उपस्थित एका नातेवाईकाने लोहाऱ्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना दिली. ही माहिती मिळताच तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी कार्यक्रम स्थळी जाऊन नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले व त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले. या दोन्ही कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करावे असे आवाहन तहसीलदार कुलकर्णी यांनी यावेळी केले. यावेळी ऍड. दिपक जवळगे, डॉ. श्रीनिवास जाधव, विठ्ठल रसाळ, उत्तम अमृतराव, प्रदीप कदम यांच्यासह वधूवरांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.


————————-
अनावश्यक खर्चाला फाटा देत अशा प्रकारचे विवाह होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या निर्णयाचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

प्रसाद कुलकर्णी,
तहसीलदार, लोहारा

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: विवाह सोहळा
Previous Post

लोहारा पंचायत समिती कार्यालयात एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

Next Post

सास्तुर येथील अंजली चलवाड, बी. एम. बालवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
सास्तुर येथील अंजली चलवाड, बी. एम. बालवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

सास्तुर येथील अंजली चलवाड, बी. एम. बालवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's