तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नंदकुमार गरगडे तर उपाध्यक्षपदी अंगद भोंडवे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी नुतन शाळा व्यवस्थापन समितीची निवड माजी अध्यक्ष मोहन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यपदी सारीका हिरवे, समिना मुजावर, सुनिता मत्ते, सविता दळवे, सुरेखा भोंडवे, शिवहरी दळवे, मारूती भोंडवे, मोहन गोरे, शिक्षक प्रतिनिधी उषा बर्डे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अंकिता भोंडवे, ज्ञानेश्वरी भोंडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर अध्यक्षपदी सर्वांनुमते नंदकुमार गरगडे व उपाध्यक्षपदी अंगद भोंडवे यांची निवड करून सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास घोडके, सहशिक्षिका उषा बर्डे, अंजली गरगडे, कालींदा मत्ते, रोहीणी पाटील, जगन्नाथ भोंडवे, विनायक गरगडे, गंगाराम भोंडवे, लक्ष्मण भोंडवे, रामचंद्र मत्ते, विनायक दळवे, हमीद मुजावर, चॉंद मुजावर, बाबुलाल मुजावर, भरत मत्ते, दयानंद सोनटक्के, प्रशांत गोरे यांच्यासह पालक, नागरीक, विद्यार्थी उपस्थित होते. निवडीनंतर मुख्याध्यापक विकास घोडके यांनी शाळेला सहकार्यासाठी सर्वांना अवाहन केले. यावेळी सर्वांनी मिळून शाळा सुधारणेसाठी एकत्रित प्रयत्न करू. समाज, गाव सहभागातून, लोकसहभागातून शाळेला सहकार्य करु असे बैठकीत ठरले.सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते बिनविरोध पार पडल्या.