दिनांक 02 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर येथे “राष्ट्रीय स्तरावरील गणित विषयाच्या अबॅकस” स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये सिनिअर के.जी. या वर्गात शिकत असलेली कु.आरोही विनोद जोकार हिने 5 मिनिट 56 सेंकदात सर्व प्रश्न सोडवून 100 पैकी 98 गुण मिळवून या स्पर्धेत राष्ट्रिय स्तरावरील 4 थ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल स्कुलचे अध्यक्ष डॉ सुहास भोसले, प्राचार्य श्री शहाजी जाधव, प्रा. यशवंत चंदनशिवे , संचालिका सविता जाधव, शिक्षिका हेमा पाटील, सरिता पवार यांनी तिचा सत्कार करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या या यशाबद्दल पालक वर्गातूनहि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.