लोहारा तालुक्यातील नागुर येथील सुनील वरवटे यांची केंद्र शासनाच्या कृषी अधिकारी – वर्ग १ ( शास्त्रज्ञ) या पदावर निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका धनगर समाजाच्या वतीने शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल येथे सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुका धनगर समाजाच्या वतीने बुधवारी (दि.१२) रात्री श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला तहसीलदार रणजित कोळेकर लोहाऱ्याचे तहसीलदार म्हणून रुजू झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी तालुक्यातील नागुर येथील सुनील वरवटे यांची केंद्र शासनाच्या कृषी अधिकारी – वर्ग १ ( शास्त्रज्ञ) या पदावर निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका धनगर समाजाच्या वतीने शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना डॉ. हेमंत श्रीगिरे म्हणाले की, सुनिल वरवटे यांनी बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन यश संपादन केले. त्यांची भविष्यात अशीच प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळ अधिकारी जगदिश लांडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर व सुनिल वरवटे यांचा आदर्श समोर ठेऊन आपल्या मुला- मुलींना शिक्षण द्यावे. मुला-मुलींनी परिस्थितीवर मात करीत शिक्षणात भरारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. तहसीलदार कोळेकर व सुनील वरवटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. हेमंत श्रीगिरे, डॉ. रुपाली श्रीगिरे, उपसरपंच व्यंकट घोडके, मंडळ अधिकारी जगदीश लांडगे, सुधीर घोडके, दत्तात्रय गाडेकर, उमेश देवकर, सुरेश वाघमोडे, इंद्रजित वरवटे, लतीका वरवटे, केशरबाई वरवटे, प्रा.लक्ष्मण गायकवाड, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, सुर्यकांत पांढरे,भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पत्रकार गणेश खबोले, राजु बंडगर, युवा नेते प्रशांत थोरात, युवा नेते प्रेम लांडगे, आकाश विरुद्धे, कृष्णा विरुद्धे, अनिल घोडके, उत्तम अण्णा पाटील, योगेश गाडेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. सुत्रसंचालन सुर्यकांत पांढरे यांनी तर सुरेश वाघमोडे यांनी आभार मानले.
