लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला नमन व स्मरण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. सरपंच भाग्यश्री पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले.
यावेळी उपस्थित सरपंच भाग्यश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, ग्रामविकास अधिकारी पोतदार डी. एम. , संगणक परिचालक अमोल कांबळे, शिपाई कमलाकर देशपांडे, बबन बाबर, व्याख्याते गोपाळ माने, बालाजी मातोळे, महादेव भालेराव आदींची उपस्थिती होती.