नांदेड येथे नुकत्याच झालेल्या विभागीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत लोहारा शहरातील श्वेता शिवराज झिंगाडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त तिचा भारतीय डाक विभागाच्या वतीने व शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या यशामध्ये तिला आई, वडील व क्रीडा शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्वेता झिंगाडे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारतीय डाक विभागाच्या वतीने श्वेता झिंगाडे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोस्टमास्टर उद्धव कलारे, संतोष चव्हाण, बालाजी पांचाळ, दत्तविठ्ठल हाके, कल्याण कांबळे याच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.