लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्राम करबसप्पा तडकले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार कृषी दिनाच्या निमित्ताने देण्यात आला.
समाजातील व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात सर्वसामान्य माणसाच्या माणूसकीच्या नात्याने कार्य करून समाजात एक आदर्श निर्माण करत असतात. म्हणून या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करण्यात येणाऱ्या व्यक्तीला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गाव पातळीवर सामाजिक दृष्ट्या कार्य करत असलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डक साहेब, डॉ.एस.एस मगर, माजी कुलगुरू बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, समाज सेवक यादवराव पावसे पाटील, सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील,राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सेवा संघाचे सन्माननीय नेते संजय काळे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सिद्रामप्पा तडकले यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला.
माऊली सांस्कृतिक सभागृह, अहमदनगर येथे सोमवार दि.१ जुलै २०२४ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आदर्श सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, यशस्वी शेतकरी, उद्योजक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल शेवाळे यांनी आभार मानले.