उमरगा ( अ. जा. ) राखीव असलेल्या मतदार संघातून विधानसभा निवडणुकीची महाशक्ती परिवर्तन आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल केल्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगून निवडून येण्यासाठी आपला आशीर्वाद द्यावा अशी मागणी सातलिंग स्वामी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली.
परिवर्तन महाशक्ति आघाडी मधील प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार सातलिंग स्वामी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमरगा ( अ. जा. ) मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज दाखल केला .
सातलिंग स्वामी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे प्रतिनिधित्व करताना लोकांसमोर नव्या दृष्टिकोनाने विकास साधण्याचे आणि पारंपरिक राजकारणाच्या बाहेर जाऊन जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आपल्या अर्जाद्वारे स्थानिक प्रश्नांवर ठोस कामगिरीचे वचन दिले आहे, विशेषतः ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण आणि स्थानिक रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर जोर दिला आहे.
या उमेदवारी अर्ज सादरीकरणामुळे स्थानिक राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, निवडणुकीच्या मैदानात महाशक्ती आघाडीचा प्रभाव वाढू शकतो. सातलिंग स्वामी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीतील ना. ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षामुळे आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज सन्माननीय संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्ष व अन्य घटक पक्षांच्या एकसंघ सहभागामुळे या निवडणुकीत स्थानिक राजकारणासह महाराष्ट्र राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रसंगी माडज येथील दिनेश पाटील, महेश कुंभार, सकल जंगम समाजाचे उमरगा लोहारा तालुका पदाधिकारी शंभूलिंग स्वामी, मुरुम येथील नागनाथ स्वामी, आलूर येथील रेवण फुलमाळी, पत्रकार सचिन शिंदे, विजयकुमार स्वामी, सिद्धाराम कोळी, वीरभद्र स्वामी आदींसह उमरगा-लोहारा मतदारसंघातील बहुसंख्य मतदार, नागरिक उपस्थित होते.