उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारसभांना उमरगा लोहारा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात आहे.
उमरगा लोहारा तालुक्यातील भातागळी, कास्ती खुर्द, कास्ती बुद्रुक, लोहारा खुर्द या गावांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या कॉर्नर सभा घेण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राजकारणा बरोबरच त्यांनी समाजकारणामध्ये मोठे योगदान दिले आहे. कायमच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेते म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले यांची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये उमरगा लोहारा तालुक्यात केलेल्या विकास कामामुळे आगामी निवडणुकीत विजय मिळवतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उपसरपंच अर्चना राठोड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अविनाश राठोड, चेअरमन केशव पाटील, माजी चेअरमन ब्रह्मानंद पाटील, भाजपा उपतालुका प्रमुख दत्ता कडबाने, भाजपा शाखाप्रमुख बाबुराव राठोड, ग्रामपंचायत सदस्य, जया कांबळे, सचिन जाधव, पप्पू बिडवे, नागेश कुलकर्णी, टायगर ग्रुपचे अमोल राठोड, दादा गव्हाळे, राजेंद्र गव्हाळे, गौतम बालकुंदे, यशवंत गरड, उमा जाधव, लोहारा खु. चे सरपंच सचिन व्यंकट रसाळ, उपसरपंच सचिन बाळू रसाळ, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत मुरटे, चेअरमन बळी इंगळे, तंटामुक्त अध्यक्ष अनिल इंगळे, सुनील वसंत मुरटे, किसन रसाळ, संजय कांबळे, रखमाजी सूर्यवंशी, दत्ता रसाळ, अर्जुन मुरटे, महादेव पाटील, महादेव अरगळे, हरी गाडवे, बालाजी रसाळ, नरहरी रसाळ, कास्ती बु. सरपंच अखिल तांबोळी, माजी सरपंच बालाजी कुंभार, चेअरमन ज्ञानेश्वर कुंभार, माजी चेअरमन आनंद पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार रवळे, कल्लेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रदीप भरगांडे, शरद साबळे, मुकुंद परसे, शाहूराज पाटील, दादासाहेब चव्हाण, प्रशांत भंडारे, रामेश्वर जावळे, बालाजी काळे, संतोष चव्हाण, भागवत चव्हाण, पंडित परसे, नंदकुमार वाळके आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.