धाराशिव येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुमार केसरी कुस्ती स्पर्धेत लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी कला शाखेतील विद्यार्थी संघदीप हिराचंद कांबळे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धा जिल्हा कुस्तीगीर संघटना व राज्य कुस्तीगीर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे 7 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आल्या. त्याच्या या यशाबद्दल कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी संघदीप कांबळेचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे, नागनाथ पांढरे, भास्कर जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.