लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ओलंपियाड स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे.
या स्कुलच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ओलंपियाडमध्ये २४, सायन्स ओलंपियाड मध्ये २ व गणित ओलंपियाड मध्ये ३५ असे एकूण ६१ सुवर्णपदक मिळाले. गणित ओलंपियाड स्पर्धेमधील ८ मुलांची सेकंड लेवलसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना जेवळेकर मॅडम व माळवदकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. ओलंपियाड स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे सर्व विद्यार्थी व पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षिका यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे, सचिव किशोर साळुंके व दीपक जवळगे यांनी कौतुक केले.