पर्यावरण दिनानिमित्त (Environment day) लोहारा (lohara) तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आले होते. मंगळवारी (दि.११) या उन्हाळी वर्गाचा समारोप झाला.
इको क्लब ऑफ मिशन लाईफ अंतर्गत दि.५ ते ११ जून या कालावधीत हे उन्हाळी वर्ग घेण्यात आले. विद्यार्थ्यांचा स्थर लक्षात घेऊन अनेक प्रकारचे उपक्रम त्यामध्ये राबवण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैली, पाण्याचे महत्व, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, प्लास्टिकचा वापर टाळने, ऊर्जेची बचत इत्यादी अनेक प्रकारचे विषय घेऊन हे उन्हाळी शिबिर राबवण्यात आले. यात रोज सकाळी एक तास हे उन्हाळी वर्ग घेण्यात आले. विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये सर्व विषयाबद्दल माहिती देण्यात आली. या उन्हाळी वर्गास विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद चांगला मिळाला. या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून मल्लिकार्जुन कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शिक्षक आनंद कानेगावकर, खिजर मोरवे, सुनंदा निर्मळे यांचे पण सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे पाणी आडवा पाणी जिरवाचे चित्र, ऊर्जा बचतीची चित्र व प्लास्टिक मुक्तीचे चित्र अशा प्रकारचे अनेक चित्र विद्यार्थ्यांनी काढले.