लोहारा (lohara) तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले.
धाराशिव (dharashiv) येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. आर. कोरे यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी किशोर साळुंके, दिपक जवळगे, शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले. त्यामध्ये धनगर गीत, पारंपारिक गीत, क्लासिकल सॉंग, आदिवासी गीत, देशभक्तीपर गीत , लावणी, फनी सॉंग, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, सोशल मीडियाचे दुष्परिणाम दाखवणारी नाटिका इत्यादीचे अतिशय उत्कृष्ट रित्या सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. व मुलांचे मनोबल वाढवले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे दृश्य पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले. शिवरायांचे विचार जागृत झाले. एस. आर. के सॉंग ने सर्वांची मने जिंकली. सोशल मीडिया थीम मुळे आजचे विद्यार्थी आणि पालक यांचे वास्तव दाखवण्यात आले. अतिशय आनंदात व मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम सूर्यवंशी यांनी तर सुनिल कांबळे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वैशाली चपळे, सोनाली आलमले, गीता चीकुंद्रे, सबिया शेख, अश्विनी वाघमारे, शितल कदम, अस्मिता मम्माने, फराना शेख, ज्योती साठे, प्रतीक्षा गिराम, रोहिणी पाटील, सुवर्णा शिंदे, अश्विनी आळंगे, आशा कांबळे, शिवमाला हुडगे, मनीषा जेवळे, श्रीदेवी हावळे, सोनाली उपाशे, रंजीत कांबळे, सोमनाथ कुसळकर यांनी परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलनातील काही क्षणचित्रे