भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अध्यक्षपदी महादेव आनंदगावकर, उपाध्यक्षपदी महादेव जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शनिवारी (दि.१७) बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी महादेव आनंदगावकर, उपाध्यक्ष पदी महादेव जगताप यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी अजित यादव व धनंजय शिंदे, सहसचिवपदी प्रविण जगताप, मिरवणूक प्रमुखपदी महेश जगताप व खंडू फत्तेपुरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्वराज ग्रुपचे मार्गदर्शक उपसरपंच हनुमंत कारभारी, तानाजी आनंदगावकर, प्रविण पाटील, अन्नदाते उत्तम सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली.
यावेळी गणेशमूर्ती ही युवा उद्योजक प्रज्योत जगताप व बळवंत आनंदगावकर यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्येक वर्षी समितीच्या वतीने वेगवेगळे सामाजिक कार्य करीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षी समितीच्या वतीने ५०० पेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीसाठी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज जगताप, कैलास इंगळे, श्रीकांत गिरी, अनंत पोतदार, प्रशांत अभंगराव, माऊली आनंदगावकर, प्रभू खोत, प्रवीण जगताप, नाना समदळे, पवन जगताप, सुधाकर साठे, बाळासाहेब आनंदगावकर, राहुल सुरवसे, प्रतिक आनंदगावकर यांच्यासह स्वराज्य ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.