लोहारा (Lohara) तालुक्यातील राजेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय व शरद पवार विद्यालयाच्या वतीने सोमवारी (दि. १४) रतन टाटा (Ratan Tata) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लोहारा तालुक्यातील सास्तुर (sastur) व परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप (Earthquake) झाला होता. त्यानंतर रतन टाटा यांनी तालुक्यातील राजेगावचे पुनर्वसन करून देऊन दानशूरपणा दाखवून दिला होता. अशा या महान व्यक्तिमत्वास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय व शरद पवार विद्यालयाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच सुरेश देशमुख, ग्रामसेवक भाऊसाहेब मोरे, मेजर चंदकांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रविण देशमुख, कालिदास बनसोडे, शिक्षक अविनाश देशमुख, अंगणवाडी कार्यकर्ती छाया देशमुख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.