लोहारा शहरात रविवारी (दि.२५) तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारतीय सैन्याच्या या शौर्याचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि.२५) लोहारा शहरात भारत माता मंदिर ते तहसील कार्यालय दरम्यान तिरंगा यात्रा काढण्यात आली. या पायी यात्रेमध्ये लोहारा शहर व तालुक्यातील माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या. ही पायी यात्रा तहसील कार्याजवळ आल्यानंतर माजी सैनिक राजेंद्र सुर्यवंशी, सुधीर पाटील, रमेश ठेले, महादेव सलगर, प्रकाश मुळे, शिवाजी मुलगे, चंद्रकांत थोरात, अजय जाधव, इंद्रजित सुर्यवंशी, दिलीप पवार यांचा सत्कार करण्यात आला. या तिरंगा यात्रेत शिवशंकर हत्तरगे, जगन्नाथ पाटील, शामसुंदर तोरकडे, अमिन सुंबेकर, राजेंद्र पाटील, दगडु तिगाडे, अविनाश माळी, प्रशांत काळे, दिपक मुळे, नेताजी शिंदे, विक्रांत संगशेट्टी, अनिल ओवांडकर, इकबाल मुल्ला,

अभिमान खराडे, बाबा सुंबेकर, परमेश्वर साळुंके, प्रमोद बंगले, ओम कोरे, सतीश गिरी, विनोद मुसांडे, युवराज जाधव, मुरलीधर होनाळकर, मनोज तिगाडे, दत्ता पोतदार, शंकर जाधव, बंडू पोतदार, निकेश बचाटे, संपत देवकर, दिलीप पवार, हाजी बाबा शेख, मल्लीनाथ फावडे, ईस्माइल मुल्ला, बसवराज पाटील, संजय कदम, सुयेश दंडगुले, कल्याण ढगे, व्यंकट कागे, मोहन जेवळीकर, काशीनाथ घोडके, बबनजी महाराज, खंडु जाधव, विजय महानुर, संजय दरेकर, अॅड. रविकांत भोंडवे, अॅड. संगमेश्वर माशाळकर, सुनिल सुर्यवंशी, परमेस्वर माशाळकर, संजय लांडगे, दत्तात्रय दंडगुले, अशोक तिगाडे, प्रविण कांबळे, शिवा थोरात, शुभम गोसावी, रोहीत नारायणकर, पांडुरंग नारायणकर, विकास थोरात, योगेश बाभळे, शुभम माळी, अजय गोसावी, समिर हेड्डे, बळी रोडगे, ज्ञानेश्वर काडगावे, अंगद भोंडवे, शिवराज चिनगुंडे, श्रीकांत बिराजदार, जितु कदम, महादेव गाडेकर, सौरभ कागे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






