मकर संक्रातीचे औचित्य साधून प्राईड इंडिया (Pride India) संचालित फिरते वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून ७२ गावामध्ये महिलांचे आरोग्य मेळावे (women’s health meeting) घेण्यात आले.
प्रास्तविक करताना श्री. अच्युत आदटराव असे म्हणाले कि श्री. रमाकांत जोशी (प्रकल्प व्यवस्थापक स्पर्श ग्रा.रु.सास्तूर) यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यातील ७२ गावामध्ये प्राईड इंडिया स्पर्शच्या तीन अद्यावत मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. मकर संक्रातीच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील गावागावात महिलासाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात प्राईड इंडिया च्या वतीने याच समारंभाना व्यापक स्वरूप देऊन ७२ गावामध्ये महिलासाठी आरोग्य मेळावे साजरे करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी उखान्याच्या स्पर्धा, संगीतखुर्ची, गाण्यांच्या भेंड्या, आरोग्य शिक्षणांचे धडे देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस स्वरुपात भेटवस्तू देण्यात आल्या.सदर शिबिरामध्ये एकूण ३५२१ महिलांनी सहभाग नोंदवला तर २५० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हे आरोग्य मेळावे यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रशांत जाधव (मेडिकल ऑफिसर), डॉ. सुनिता चक्करवार, श्रीमती पुनम राजपूत,(नर्स), श्रीमती अंजुम इनामदार, श्रीमती गायकवाड, श्रीमती सविता लंगोटे (फार्मासिस्ट), श्री. सुरज चव्हाण (सुपरवायजर), श्री. मनोहर माळी, अविनाश राठोड, कमलाकर माळी इ. सर्व मोबाईल मेडिकल युनिटच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.