ग्रामविकास व पंचायत राज विभागा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा,तालुका स्तरावरील कार्यरत कर्मचारी तसेच समुदाय संसाधन महिला यांच्या प्रलंबित मागण्यासाठी संघटनेच्या वतीने शासनाकडे नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.
उमेद अभियानातील सर्व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याची शासनाने दखल घ्यावी यासाठी राज्य संघटनेकडून गावस्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत आंदोलनाबाबत चा कृती कार्यक्रम ठरविण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून लातूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी काम बंद करणार असले बाबतचे निवेदन तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे असे लातूर जिल्हा उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.तसेच या काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन काम बंद आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा संघटना अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात येत आहे.