लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवारी (दि.२९) जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी राजोळे हे होते. यावेळी डॉ. पार्वती माने म्हणाल्या की, निसर्ग रक्षण करणे काळाची गरज असून त्यासाठी मानवाने आपल्या अमर्यादित गरजावर नियंत्रण करणे गरजेचे आहे. नाहीतर एक दिवस माणूस स्वतः चा विनाश व्हायला वेळ लागणार नाही. याचा प्रत्यय आपल्याला कोरोना काळात आला आहे. तरी आपण सर्वांनी निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी तत्पर असावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. भैरवनाथ मोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्ता कोटरंगे यांनी तर डॉ. सी. जी. कडेकर यांनी आभार मानले.