वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील काँग्रेसचे नेते, माजी जि प सदस्य हे काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर दिपक भैय्यांनी शिवबंधन बांधल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. मंगळवारी (दि. २७) मुंबई येथे दिपक जवळगे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवसेना पुन्हा एकदा त्याच ताकतीने उभी राहील असे सांगितले. दिपक जवळगे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना पक्ष पुन्हा एकदा नव्याने उभारी घेईल असे बोलले जात आहे.