वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व स्टेट बँक ऑफ इंडिया निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० डिसेंबर रोजी एसबीआय निलंगा येथे शेडोळ, अंबुलगा व मदनसूरी प्रभागातील एकूण १२ बचत गटाचा बँक मेळावा आयोजित करून २३ लाख रुपयाचे कर्ज मंजूर करून ४ गटांना ८ लाख रुपये वितरित करण्यात आले. जिल्हा व्यवस्थापक विपणन वैभव गुराळे यांनी बँकेकडून प्राप्त होणाऱ्या कर्जातून बचत गटाच्या महिलांनी कृषी व बिगर कृषी विषयक उपजीविका निर्माण करून आपल्या कुटुंबाच्या उत्पनास हातभार लावून कर्जाचा सुयोग्य वापर करावा असे उपस्थित महिलांना संबोधित केले. तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी आझादी का अमृत महोत्सव निमित्त राबविण्यास येत असलेल्या जागर कर्ज परतफेडीचा याबद्दल माहिती देऊन नियमित कर्ज परतफेडीचे महत्त्व व त्यामुळे बँकेचे मिळणारे सहकार्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या मेळाव्यास कृती संगम जिल्हा व्यवस्थापक महादेव शिंदे व बँक मॅनेजर सौरव कुमार यांच्या सह गटाच्या महिला उपस्थित होत्या. या बँक मेळाव्याचे यशस्वी नियोजन बँक कर्मचारी, सर्व प्रभाग समन्वयक, तालुका व्यवस्थापक व बँक सखी यांनी केले.