Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उसतोडीला निघालेली कुस्तीपटू लक्ष्मी लागली ऑलम्पिकच्या तयारीला – आमदार सतीश चव्हाणांनी लक्ष्मीच्या तयारीचा सर्व खर्च उचलल्याने पवार कुटुंबाला मिळाला मोठा आधार

admin by admin
08/12/2021
in मराठवाडा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पुढे खेळण्याची जिद्द आणि चिकाटी तर आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च करण्याची ऐपत नसल्याने औसा तालुक्यातील खानापूर तांडा येथील प्रतिभावान कुस्तीपटू लक्ष्मी सीताराम पवार ही ऑलम्पिक मध्ये खेळण्याची तयारी सोडून आईबाबां बरोबर ऊस तोडणीला निघाली होती. ही बाब आमदार सतीश चव्हाण यांना समजताच त्यांनी लक्ष्मीच्या कुटुंबाशी संपर्क साधून तिला मंगळवारी (दि.७ ) लोहारा येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात बोलावून तिच्या पुढच्या सर्व खर्चाची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तालीम सोडून उसाच्या फडाकडे निघालेले लक्ष्मीचे पाय परत तालमीकडे वळले आहेत. लक्ष्मीला आमदार सतीश चव्हाणांनी दत्तक घेत पुण्याच्या एका आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवत असलेल्या अकॅडमीत प्रवेश दिल्याने लक्ष्मीच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.लक्ष्मी सीताराम पवार ही कुस्तीपटू लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात येणाऱ्या खानापूर तांडा येथील रहिवासी आहे. आई वडील भाऊ यांनी कष्ट करून मिळविलेल्या पैशावर लक्ष्मी आपली प्रॅक्टिस करत होती. दोन एकर कोरडवाहू आणि बिनभरवशाची शेती साथ देत नसल्याने लक्ष्मीला पैसे पुरविण्यासाठी सगळे कुटुंब राबत होते. याचे चिजही लक्ष्मीने केले. तिने राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार तर २०२० मध्ये खेलो इंडिया अंतर्गत ओडिशा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तिला ऑलम्पिक मध्ये खेळण्याचा ध्यास लागला होता. या स्पर्धेची तयारी करण्यासाठी तशी तालीम, खुराक आणि प्रशिक्षक हवा होता. त्यासाठी खूप खर्च येणार असल्याने लक्ष्मीच्या कुटुंबाने खूप प्रयत्न केले मात्र थोडीफार इतर लोकांनी मदत केली. तीही तोकडीच ठरू लागली. स्वतःच्या जीवाचा विचार न करता आई बाबा आणि भाऊ करीत असलेली मेहनत आणि कष्ट लक्ष्मीने डोळ्याने पाहिले होते. आता ऑलम्पिकची तयारी करण्यासाठी लागणारा खर्च तिला पेलवणार नव्हता म्हणून तिने तिचा खेळ थांबवून आई बाबा सोबत ऊस तोडणीला जाण्याचा विचार केला.ही गोष्ट मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना समजताच त्यांनी तात्काळ लक्ष्मीच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि तिच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलत तिला पुण्यातील नामवंत किरण मोरे यांच्या अकॅडमीत प्रवेश दिला. यापुढे लक्ष्मीला खर्चाची चिंता राहिली नसून ती आता ऑलम्पिक मध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीने कामाला लागली आहे. परिस्थितीत भरडून आपले ध्येय अर्ध्यावरच सोडणाऱ्या लक्ष्मीला मोठा आधार मिळाल्याची सर्वत्र चर्चा होत असून लक्ष्मीने खेळावर लक्ष केंद्रित करून जिद्दीने खेळावे आणि ऑलम्पिक पदक मिळवावे. आम्ही सर्व तिच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात मंगळवारी (दि.७) झालेल्या तिच्या सत्कार समारंभात आमदार सतीश चव्हाण यांनी लक्ष्मी चा सत्कार केला व तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. सतीश इंगळे, शहाजी मोहिते, हनुमंत कारभारी, प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार सतीश चव्हाणऑलम्पिक
Previous Post

ओबीसी प्रभागातील निवडणुकीस स्थगिती – इच्छुकांचा हिरमोड – उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक होणार – प्राप्त अर्जांची आज होणार छानणी

Next Post

लोहारा नगरपंचायत निवडणूकीसाठी दाखल ११५ पैकी २८ उमेदवारी अर्ज ठरले अवैध – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र तर काँगेस (आय) स्वबळावर निवडणूक लढणार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा नगरपंचायत निवडणूकीसाठी दाखल ११५ पैकी २८ उमेदवारी अर्ज ठरले अवैध - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र तर काँगेस (आय) स्वबळावर निवडणूक लढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's