वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – लोहारा – सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील भानुदास चव्हाण महाविद्यालयात दि. २९ एप्रिल रोजी एकल महिला संघटना लोहारा यांच्या वतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पँथर रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या जिल्हाध्यक्षा उज्वला गाटे व लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका शामलताई माळी, आरती सतिष गिरी, संगीता किशोर पाटील, सारिका प्रमोद बंगले, ज्योती पाटील, जयश्री वैरागकर, विजयमाला कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसाय माळी यांनी तर जनाबाई काळे यांनी आभार मानले. यावेळी अर्चना पवार, शितल खराडे, कोरो इंडियाचे राम शेळके आदी उपस्थित होते.