वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील करजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी साहेबराव जाधव तर उपाध्यक्ष पदी कल्पना जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील करजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.२३) पालक सभा आयोजित करण्यात आली होती. यात शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून साहेबराव जाधव तर उपाध्यक्ष पदी कल्पना जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच सदस्य म्हणून पोपट गायकवाड, सचिन गवळी, सुनंदा घोडके, अंबादास घोडके, महादेवी कुलकर्णी, रेश्मा धोत्रे, मीराबाई कुलकर्णी, संतोष पवार, रामकृष्ण बिराजदार, किसन जाधव, उमाकांत पवार, संजय जाधव, राणी जाधव, भाग्यश्री माने यांची निवड एकमताने करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पवार यांनी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी साळुंके, शिक्षक रामकृष्ण बिराजदार, राम माने, अमोल गुरव, इंदुमती जगताप, वर्षाराणी माने यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.