वार्तादूत न्युज नेटवर्क –
केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गावर होणारी टोलवसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य केला आहे. दि. १ जानेवारी २०२१ पासून प्रत्येक चारचाकी वाहनाला फास्टॅग असणे बंधनकारक असल्याची घोषणा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. परंतु १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत चारचाकी वाहनधारकांना फास्टॅग लावण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. सुट्टीच्या वेळी फिरायला गेल्यावर प्रत्येक टोलनाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगामुळे अनेकदा विलंब होतो. त्यामुळे वाहनांना फास्टॅग लावला तर वेळेची बचत होईल. यापूर्वी ३१ डिसेंबर २०२० अखेर वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु केंद्र सरकारने ही मुदत वाढवून दिली आहे.
फोटो सौजन्य – wordpress.com