वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील देवबेट देवी यात्रेनिमित्त भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अटीतटीच्या झालेल्या अंतिम कुस्तीत मुंनतजीर सरनोबत याने बाजी मारली.
तालुक्यातील धानुरी येथे देवबेट देवी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत अनेक पैलवानांनी सहभाग घेतला होता. यावेळी अंतिम कुस्ती अटीतटीची झाली. उमरगा तालुक्यातील कसगी येथील मुंनतजीर सरनोबत व परंडा येथील सुनील जाधव यांच्या अंतिम कुस्ती झाली. यात मुंनतजीर सरनोबत याने बाजी मारली. त्यांना माजी जि. प. सदस्य दिपक जवळगे व ग्रामस्थांच्या वतीने दीड किलो चांदीची गदा व रोख २१ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, माजी सरपंच गणेश जाधव, माजी उपसरपंच संभाजी वडजे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राम पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत जाधव, करजगावचे उपसरपंच नागनाथ पवार यांच्यासह महादेव जाधव, दयानंद साळुंके, लक्ष्मण सुरवसे, अब्बास शेख, नितीन सूर्यवंशी, सचिन तिगाडे, महेश साळुंके, सतीश लोहटकर, सुरज साळुंके, राम मुसांडे, गणेश जाधव, बालाजी सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.