Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेस भक्तिमय वातावरणात प्रारंभ

by admin
in मराठवाडा
A A
0

नांदेड : महाराष्ट्रातील लोक संस्कृतीच्या उपासकांचा, भक्तीचा आणि श्रध्देचा महामेळा म्हणून गणल्या गेलेल्या माळेगाव यात्रेचा आज मान्यवरांच्या हस्ते विधीवत पुजा करुन प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक श्री खंडोबाची पुजा करुन दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, प्रणितीताई देवरे- पाटील व मान्यवरांनी खंडोबाचे दर्शन घेवून भाविकांना शुभेच्छा दिल्या.

लम्पी समवेत नव्याने कोरोनाचे आव्हान येवू घातले आहे. सद्यपरिस्थितीत चिंतेचे कारण जरी नसले तरी मागच्या अनुभवावरुन काळजी घेण्याशिवाय गत्यंतर नाही. यावर लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे सिध्द झाले आहे. हे लक्षात घेता अधिकाधिक लसीकरण व्हावे यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असून माळेगाव येथे कोरोना लसीकरणाचे कक्ष सुरु करण्यात येत आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाला निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी स्वयंस्फूर्त पुढे येवून लसीकरणावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

\"माळेगाव

यात्रेचे आजवरचे वैभव लक्षात घेवून जिल्हा परिषदेने यात्रेसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यात पाणी, उर्जा, आरोग्य यावर विशेष लक्ष दिले आहे. लम्पी आजारामूळे गो वंशीय पशुधनावर बंदी घातली असून त्याबाबत काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तथापि इतर पशुधनासाठी याठिकाणी 24 तास वैद्यकीय सुविधा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर भाविकांच्या आरोग्याबाबतही काळजी घेण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या सेवाही तत्पर ठेवल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिली.

\"\"

यावेळी भाविकांनी शिस्तीत रांगेत राहून खंडोबाचे दर्शन घेतले. दोन वर्षाच्या खंडानंतर सुरु झालेल्या यात्रेमुळे जागोजागी चैतन्य पाहावयास मिळाले. बेल-फुल, भंडाऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष यांने मंदिर परिसर निनादून गेला. देवस्वारी आणि पालखीची नगर प्रदक्षिणा मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर आली. खंडोबाच्या देवस्वारीची पुजा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी करुन दर्शन घेतले. परंपरेनुसार रिसनगावचे पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक यांच्यासह इतर मानकऱ्यांचा फेटा बांधून जिल्हा परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला.

\"\"

जिल्हा परिषदेच्या वतीने याठिकाणी लोककल्याणकारी योजनांचे विविध स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कृषि विभाग, पशुसंवर्धन, समाज कल्याण व इतर विभागांचा समावेश आहे. या यात्रेत आश्व, श्वान, कुक्कुट व इतर प्राण्यांची संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यात्रा कालावधीत 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभाग सतर्क ठेवण्यात आला आहे.

Ad 2
Ad 1
Tags: नांदेडमाळेगाव यात्रा
Previous Post

उमरगा तहसील कार्यालयातून लोहारा तालुक्याचे जुने रेकॉर्ड ताब्यात घेऊन लोहारा तहसीलमध्ये उपलब्ध करून द्या : संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

लोहारा तालुक्यात वेळ अमावस्या सण साजरा – शेतकऱ्यांनी घेतला कुटुंबीय व मित्र परिवारासह वनभोजनाचा आस्वाद

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यात वेळ अमावस्या सण साजरा - शेतकऱ्यांनी घेतला कुटुंबीय व मित्र परिवारासह वनभोजनाचा आस्वाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!