Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

निलंगा तालुक्यातील हासुरी गावची भुगर्भशास्त्राच्या तज्ञ टीम कडून पाहणी – जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाने दिल्या सूचना

by admin
in मराठवाडा
A A
0

लातूर, दि.१४:
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासुरी येथे बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या सांगण्यावरून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भुगर्भाशास्त्र विभागाच्या टिमने भेट दिली. सदरील क्षेत्र किल्लारीपासून जवळच असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. तसेच धोकादायक घरामध्ये आश्रय न घेण्याचा सल्ला दिला. भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था, नवी दिल्ली यांच्या टिमलाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यावेळी आ. अभिमन्यू पवार उपस्थित होते. त्यांनी लातूर जिल्ह्यातील भूकंप आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व सदृढ करण्याच्या सूचना यावेळी केल्या. तसेच विद्यापीठाच्या पथकासह हासोरी गावात भेट देऊन पाहणी केल्याचे सांगून नागरिकांनी भीती दूर करून क्षमता बांधणीच्या आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याचे सूचना केल्या. या ठिकाणी मागील काही दिवसांत भूकंपसदृश्य आवाज व धक्के जाणवत असल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनास दिली होती.
यावेळी जिल्हाधिकारी यानी भूकंप व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध टिम गठीत करून त्यांचें प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश देऊन नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत असल्याचे सांगितले. या गावातील धोकादायक इमारतीना तात्काळ नोटीस देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या आहेत. पर्यायी तात्पूरत्या निवाऱ्याची सोय जिल्हा परिषद शाळा, मंदिर या संदर्भातील तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांनी यावेळी दिली.

\"\"
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, निलंगा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, वरीष्ठ भु वैज्ञानिक डॉ.एस.बी. गायकवाड, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या भुगर्भाशास्त्र विभागाच्या टिमचे पथक प्रमुख डॉ. के.विजय कुमार, डॉ.अर्जुन भोसले, संकुलाचे संचालक डॉ. अविनाश कदम, उपकेंद्राचे डॉ. प्रमोद पाटील,आपत्ती व्यवस्थापन टिम आदी संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

Ad 2
Ad 1
Tags: निलंगा तालुकाभूकंप
Previous Post

लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. श्रीकांत गायकवाड

Next Post

अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंत्यांचा झाला सन्मान – लघु पाटबंधारे विभागातील उपअभियंता इ. टी. सूर्यवंशी यांच्यासह तिघांचा झाला सन्मान

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंत्यांचा झाला सन्मान - लघु पाटबंधारे विभागातील उपअभियंता इ. टी. सूर्यवंशी यांच्यासह तिघांचा झाला सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!