वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील मार्डी येथील माजी सरपंच तथा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे नेते कै. अशोक पाटील व लोहारा शहरातील शेतकरी कै. संगाप्पा बिराजदार यांच्या निवासस्थानी माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी रविवारी (दि.१) भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, जिल्हा परिषदेचे गटनेते तथा काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश अष्टे, पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकर जट्टे, उमाजी देवकर, सेवा दल तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, दीपक मुळे, मार्डी सरपंच उषाताई पाटील, शिवाजी शेंडगे, कल्याण हक्के, माजी सरपंच अप्पासाहेब पाटील, श्रीमंत पाटील, माजी नगरसेवक अरिफ खानापुरे, शिवा स्वामी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, दत्ता गाडेकर, पोलीस पाटील तानाजी माटे, इस्माईल मुल्ला, ऍड. संगमेश्वर माशाळकर, पंचय्या स्वामी, संग्राम पाटील, काशिनाथ स्वामी, शरणाप्पा शेगजी, वीर फावडे, ओम पाटील, अहमद पाशा शेख, धर्मा देवकर, अंकुश नारायणकर, जावेद मोमीन, प्रकाश होंडराव, समीर शेख, उमाकांत माने, प्रसाद जट्टे, योगेश स्वामी, अप्पू स्वामी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.