वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा सामाजिक विचारवंत डॉ. श्रीकांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपप्राचार्यपदी डॉ. राजकुमार लखादिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर, कार्यकारी संचालक ॲड.काशिनाथ साखरे,अशोकप्पा उपासे, ॲड. धनंजय मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यवसाय अभ्यासक्रम, पदवीव्युत्तर विभाग, एन.एन.एस., एन.सी.सी., क्रीडा विभागातील प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, जुक्टा, स्वामुक्टा पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, ग्रंथालयातील कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करून पूढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अभिमन्यू रासूरे, संचालक शिवशंकरप्पा खानापुरे, ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांतप्पा उटगे, बसवेश्वर बिडवे, शिवप्पा अंकलकोटे, अशोकप्पा उपासे, डॉ. महेश हाळगे, श्याम आलुरे, राजेश्वर पाटील, प्रा. जी.एम.धाराशीवे यांच्यासह विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.