लोहारा तालुक्यातील लोहारा ( खुर्द) येथे मंगळवारी (दि. २३) खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांचे तसेच ट्रॅक्टर चालक व मालक यांचे दुसरे प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी ताराळकर, यूपीएल कंपनीचे मॅनेजर गणेश पाटील यांनी इलेक्ट्रॉन आणि क्यास्केड याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक एन. बी. पाटील यांनी बीबीएफ पेरणी यंत्रद्वारे पेरणी करण्याचे फायदे त्याचप्रमाणे बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच बीबीएफ पेरणी यंत्र जोडणी बियाण्यास बीजप्रक्रिया कशी करावी, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकांतर्गत महाडीबीटी मध्ये ऑनलाईन अर्ज करणे, एम.आर.जी एस. अंतर्गत फळबाग लागवड अर्ज सादर करणे, गोगलगायीचे एकात्मिक आणि सामूहिक नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रगतशील शेतकरी सचिन रसाळ, पोलीस पाटील बिरदेव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सचिन रसाळ, सदस्य हनुमंत सूर्यवंशी, गणेश पाटील, द्राक्ष बागायतदार नितीन रसाळ, अरुण रसाळ, बालाजी रसाळ, खंडू रसाळ, संजय मुरटे, विकास पाटील, बळीराम रसाळ, अजय रसाळ, योगेश पाटील, अर्जुन रसाळ, हनुमंत रसाळ, हनुमंत सूर्यवंशी, दत्ता गाढवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.