लोहारा – सुमित झिंगाडे
लोहारा तालुक्यातील नागुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्याचे लोडबेरीग चे काम करून वर्ग खोल्या बांधण्यात आल्या .यानंतर मागिल १० वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटला असून या इमारतीच्या खोल्या चा स्लॅप गळत आहे .यावर वारंवार दुरुस्ती च्या नावाखाली स्लॅप वर अनेक कांक्रीट चे थर देण्यात आले असून आज रोजी जवळपास फुट स्लॅप झाला असून आतील सर्व स्टील गंजले आहे. यामुळे स्लॅप व इमारत धोकेदायक होऊन ती केव्हाही पडू शकते.जर काही जीवित हानी घडली तर याला कोण जबाबदार असा प्रश्न नागरिकांतुन विचारला जात आहे, तसेच सध्या बऱ्याच खोल्यातील स्लॅप चे प्लास्टर पडत आहे.
अशा वर्ग खोल्यातच इयत्ता १ ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचा जिवीतासं मोठा धोका निर्माण झाला आहे, यावेळी शाळा प्रशासन व ग्रामस्थानी मिळून वारंवार यासाठी प्रशासना कडे याची माहीती दिली आहे. परंतु प्रशासनाने केवळ वारंवार सर्वे केला यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
सदरील धोकेदायक इमारत पाडुन द्यावी व या. धोके दायक इमारती संबंधी शासनाने तात्काळ कार्यवाही करून नविन इमारती साठी प्रयोजन करावे अन्यथा ग्रामस्था च्या वतीने अदोलन करण्यात येणार आहे असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले आहे.