लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.६) विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
तालुक्यातील बेंडकाळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविणे – २८ लक्ष रु. या कामाचे भूमिपूजन व आमदार निधीतून गावांतर्गत रस्त्यावर ३ ठिकाणी पूल बांधकाम करणे – १० लक्ष रु., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंडकाळ ता.लोहारा येथे ४ वर्गखोल्या बांधकाम करणे – ३६ लक्ष रु., या विकासकामांचे लोकार्पण शनिवारी (दि.६) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच येथील मारुती मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सर्व मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आ.चौगुले यांनी उपस्थित भाविक व सर्व मान्यवरांच्यासमवेत ह.भ.प. विरुपक्ष महाराज कानेगाव व ह.भ.प.प्रभुनाथ महाराज बेंडकाळ यांचे कीर्तन श्रवण केले. याप्रसंगी शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शरद पवार, सचिन जाधव, योगेश तपसाळे, सुरेश दंडगुले, प्रताप लोभे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, माजी गटनेते अभिमान खराडे, प्रमोद बंगले, श्रीकांत भरारे, गौस मोमीन, जालिंदर कोकणे, अमीन सुंबेकर, ओम कोरे, प्रमोद बंगले, आयुब शेख, रमेश जाधव, दत्ता मोरे, जितेंद्र कदम, मनोहर कदम, बळी कांबळे, पप्पू गोरे, शिवसेना शाखाप्रमुख दिलीप कदम, अतुल गोरे, किरण गोरे, लक्ष्मण गोरे, राजेंद्र गोरे, सहदेव गोरे, बाबुराव गोरे, बळी मोरे, अमित देशमुख, यांच्यासह बेंडकाळ गावातील व परिसरातील शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.