लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी परिसरात बुधवारी (दि. ५) दुपारी चार वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास गूढ आवाज झाला. या प्रकारच्या गूढ आवाजामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंपच होता असे काही जणांनी सांगितले. याबाबत भूकंपमापक केंद्रातील अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता ते चेक करून सांगतो म्हणाले.
बुधवारी दुपारी चार वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास जमिनीतून स्फोट झाल्या सारखा मोठा आवाज झाला. लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी या भागात गूढ आवाज झाला. अचानक झालेल्या या गूढ आवाजामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा भूकंप तर नव्हता ना अशी नागरिकांत चर्चा सुरू होती. १९९३ साली सास्तुर परिसरात महाप्रलंयकारी भूकंप झाला होता. यात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भूकंपमापक केंद्रातील अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता ते चेक करून सांगतो म्हणाले. भूकंपमापक केंद्रात याची नोंद झाली असेल तर हा भूकंप किती रिष्टर स्केलचा आहे हे कळू शकणार आहे.